Posts

'द व्हिलन' - 'तो' ही आणि 'ती' ही.

                                                           आचार्य अत्रे यांची आठवण विस्मरणात ठेवणं तसं म्हणायला गेलं तर फारच अशक्य आहे.पण, तरीही गेल्या आठवड्यात त्यांची आठवण नेहमीपेक्षा जरा जास्तच अधोरेखित झाली. त्यांनी त्या काळात त्यांच्या नाटकातून साकारलेला, ‘लखोबा लोखंडे’ आज प्रत्यक्षात अनुभवता आला. यामागेही बरेच, ‘लखोबा लोखंडे’ होऊन गेले असतील. मला ठावूक नसेल. पण, यापुढे तसे, ‘लखोबा लोखंडे’ यदा-कदाचित कधी तयार झाले तरी आपण त्यांना प्रतिसाद देवून आपली फसगत करून घ्यायला नको. इतकीच एक अभिलाषा.                                                सहजपणे जगत असताना नकळत आपण एखाद्या गोष्टीत, व्यक्तीत स्वताला गुंफत रा...

अप्रगत वाटा आणि विश्रांती.

                                                                                                                                                                     काळ कोणताही असो. आपल्या मानवानं स्वताच्या आयुष्यात नेहमीच एक सुंदर असं तारतम्य ठेवण्याचा सतत प्रयत्न केलाय. त्याच्या परंपरांचा वारसा आजही अगदी अबाधितपणे आपलं वर्चस्व सिद्ध करून दाखवतोय. भूतकाळाला तर त्यानं असं जतन करून ठेवलंय की, आजही तेव्हाचा अनुभव आपल्या सर्वाना मार्गदर्शक ठरतोय. यातूनच तर आपला सध्याचा वर्तमान व्यतीत होतोय आणि याच वर्तमानातून आपण भविष्याकडे वाटचाल करीत राहणार आहोत. नवे-नवे शोध लागताहेत त्याच प्र...

'पदोन्नती' तरीही.....

                                                                                      ' आपला माणूस' आपलं आयुष्य जीवंत ठेवण्यासाठी सतत कोणत्या ना कोणत्या तरी प्रेरणांचा वापर करीतच असतो. त्यातीलच त्याला अगम्य वाटावं अशी त्याची एक प्रेरणा म्हणजे ,  त्याचं  ‘ पद ’ . इतर सजीवांमध्ये  ‘ पदं ’  असतात की नाही  ?  हे काय मला ठाव नाही. पण ,  तरीही त्यांची  ‘ पदं ’  ठरविण्याचा प्रयत्न आपल्या या माणसानंच केलाय. याबाबत आज तरी कुणी अजाण राहिलेलं नाहीये.                                                  काही...

'साकारती अंकुर जेव्हा....'

                                                                                                                प्रश्न तयार झाले की, त्यावर उत्तरं तयार करावी लागतात. तरीही, हा खेळ समकाळानुसार पुन्हा-पुन्हा सुरूच राहतो. याला, शोध किंवा संशोधन म्हणायला काहीच हरकत नसावी. मुळात, प्रश्न सगळ्यांनाच सापडतात. पण, त्यांची उत्तरं मात्र सगळ्यांनाच सापडतील असं होत नाही. मग उरतात केवळ दोनच विकल्प. एक तर दुर्लक्ष आणि दूसरा विकल्प म्हणजे, काहीही व्यक्त करून मोकळं होणं. पण, प्रश्न विचारणारे लहानगे असतील तर ? तर, असे खूपच कमी पालक आहेत की, जे आपल्या कौशल्याने आपल्या पाल्याच्या प्रश्नांना सन्मुख ठेवतात ; आणि बाकीचे पालक, एक तर दुर्लक्ष किंवा काहीही उत्तर देवून मोकळं होणं पसंद करतात. आपल्या पाल्याच्या प्रश्नांना सन्मुख ठेवणारे प...

गेम्स - वास्तव आणि आभास.

Image
                                                                                      'खेळ' आपल्या आयुष्यात आला की आपला शारीरिक आणि मानसिक विकास होणारच यात कोणताही प्रश्न नाही. पण, सध्या आभासी जगतानं ,'शरीरासाठी विनासायास' असं तंत्र आणलय. यामुळे मनावर बरे-वाईट असे परिणाम होणार. पण, शरीराचं काय ? शरीरावर वाईट परिणामांची ताकद नक्कीच आपली सत्ता गाजवणार यातही कोणता प्रश्न नाही. बुद्धीला जागृत राहण्यासाठी मानसिकता महत्वाची आहे. तसच शरीराला सचेतन प्राप्त होण्यासाठी हालचालही महत्वाची आहे. ती नसेल तर आणि मनावर वाईट परिणाम होत असतील तर, मानसिक आणि शारीरिक आजार यांना एकत्रितपणे सामोरं जावं लागेल. एक वेळ, कमीत-कमी वयात जास्तीत-जास्त प्रगती होऊ शकेल अथवा अधोगतीही पण, या परिणामांना साथ द्यायला आपलं शरीर ठीक असायला हवं की नको ? मुळात, खेळासाठी वेळापत्रक आखून ठेवणं आणि त्याचा वापर क...

चिरतरुण 'दूरदर्शन'

                                                                                                               साधेपणा आणि आशय समृद्धी यांना, सदैव आपल्या सोबत घेऊन आपल्या वयाची साठ वर्षं पूर्ण करणार्‍या आपल्या, 'दूरदर्शन' ला माझ्याकडून सदाहरित शुभेच्छा आणि अभिनंदन सुद्धा ! दूरदर्शनची सुरवात, त्याचा इतिहास, प्रगतीचे टप्पे, त्यात आलेलं यश-अपयश, आवश्यक असे समकालीन बदल आणि आजचा दिवस याबद्दल सांगण्यासारखं खूप काही आहे. तरीही त्याची मांडणी मला या लेखात करून देता आली नाही याबाबत क्षमस्व ! पण, दूरदर्शन आणि मी यांचं नातं मात्र मला आवर्जून व्यक्त करावसं वाटतं.                                              ...

नव्या क्षितिजाच्या दिशेनं....

                                              काळ बदलत राहणं आणि सतत अतूटपणे पुढे सरकत ठेवणं ही आपल्या सृष्टीची अविरत अशी प्रक्रिया आहे. प्रत्येक सजीवाने आपल्याला लाभलेल्या काळात आपलं आयुष्य व्यतीत करणं म्हणजे त्या सजीवाचा तो समकाळ मानावा लागेल. शोध लागले की जुन्या गोष्टी कालबाह्य होणं अपरीहार्य असतं. तसं ही जुन्या गोष्टी जरा जरी त्रासदायक ठरायला लागल्या की नव्या गोष्टी अंमलात आणून ठेवणं हेही अटळच असतं.                               आपल्या केंद्र सरकारनं खुल्या केलेल्या बहू प्रतिक्षित नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांच्या मसुद्यावर मला काही मतं अभिव्यक्त करावीशी वाटत आहेत. ती मतं, मी अभिप्राय दाखल या लेखात मांडतो आहे.  मुद्दा (अ)                      ५ + ३ + ३ + ४ असा आकृतीबंध मान्य झाल्यामुळे व्यक्तिगत प्रगतीला नक्कीच एक यथा...