अंधार जेव्हा होई प्रकाशाचा वैरी
© Anmol Sutar-Annu. अंधार आणि प्रकाश खरं तर दोन्हीही परस्परांचे कट्टर विरोधाभास. तसच परस्परांसाठी तितकेच अनुरूप सुद्धा. परस्परावलंबित्वाचा सिद्धांत अगदी दोघांनाही लागू होऊन राहतो. आता त्याचं सविस्तर स्पष्टीकरण मी या लेखात देत नाही. क्षमस्व ! अनुरूपता जिथं नांदते तिथं विरोधाभास सुद्धा आपली भूमिका अगदी निक्षून बजावतात. त्याशिवाय , संतुलन म्हणजे काय ? याची व्याख्या आपण जाणू शकणार नाही. पण , बऱ्याच वेळा एखादी गोष्ट शक्य असूनही आपण , त्या गोष्टीला मुद्दाम तर कधी नकळतपणे अशक्य करून ठेवतो आणि होणार्या नुकसानीला फार कमी वेळा स्वत:ला जबाबदार धरतो. तसच जास्तीत-जास्त त्या गोष्टीच्या व्यवस्थेलाच कारणीभूत ठरवतो. अशानं सुविधा असून त्यांचा काहीच उपयोग राहत नाही. ज्ञानाच्या अभावामुळे प्रगतीचा आणि विकासाचा आलेख तटस्थच ठरतो किंवा थोड्या प्रमाणात अधोगतीकडेही झुकतो. तशीच सवय लागली तर पुढची पिढी धडपडण्या...