गेम्स - वास्तव आणि आभास.
'खेळ' आपल्या आयुष्यात आला की आपला शारीरिक आणि मानसिक विकास होणारच यात कोणताही प्रश्न नाही. पण, सध्या आभासी जगतानं ,'शरीरासाठी विनासायास' असं तंत्र आणलय. यामुळे मनावर बरे-वाईट असे परिणाम होणार. पण, शरीराचं काय ? शरीरावर वाईट परिणामांची ताकद नक्कीच आपली सत्ता गाजवणार यातही कोणता प्रश्न नाही. बुद्धीला जागृत राहण्यासाठी मानसिकता महत्वाची आहे. तसच शरीराला सचेतन प्राप्त होण्यासाठी हालचालही महत्वाची आहे. ती नसेल तर आणि मनावर वाईट परिणाम होत असतील तर, मानसिक आणि शारीरिक आजार यांना एकत्रितपणे सामोरं जावं लागेल. एक वेळ, कमीत-कमी वयात जास्तीत-जास्त प्रगती होऊ शकेल अथवा अधोगतीही पण, या परिणामांना साथ द्यायला आपलं शरीर ठीक असायला हवं की नको ? मुळात, खेळासाठी वेळापत्रक आखून ठेवणं आणि त्याचा वापर करणं हाच एकमेव विकल्प असू शकतो.
आपल्या आयुष्यासाठी आपल्या प्रत्येक अवस्था ह्या नैसर्गिक असणं गरजेचं असतं. भौतिकतेसोबत त्याचं संतुलन ठेवलं की, आपल्याला आणखी आनंदी राहता येतं. हे असं नियोजन असेल तर आपल्याला कोणत्याही उद्विपकाची काय गरज आहे ?
तरीही, समोरची गोष्ट आपल्यासाठी खरोखर आपल्या गरजेला पूर्ण करणारा उद्विपक ठरत असेल तर त्यासाठीच्या सर्व मर्यादा आपण तंतोतंत पाळायला हव्यात. याबाबतीत आपण बेशिस्त होता कामा नये. वेळेचं बंधन आपण पाळत नसेल तर मला असं सांगावसं वाटतं की, ज्या कंपन्या गेम्स तयार करतात त्या गेम्सची विक्री म्हणजे त्या कंपन्यातील कर्मचार्यांचं आयुष्य असू शकतं. आपण, नियमावली आखली तर दोघांचही आयुष्य आनंदी होऊ शकतं.
'शिल्पा बल्लाळ' (लकीर के इस तरफ) म्हणतात, "एखाद्याचं काम हे त्याच्यासाठी त्याचं आयुष्य असू शकतं. आपण विनाकारण त्यात सहभाग घेणं म्हणजे त्याच्या आयुष्याच्या दोरीनं आपण, आपल्या रिकाम्या वेळेचा पतंग इकडे-तिकडे उडवीत राहिल्याप्रमाणे होईल." यातून अंतिमता : होणारं नुकसान आपलच होणार. हे नक्की.
या जगातून आपल्याला आपल्या आयुष्यात भेटणार्या गोष्टी आणि आपण स्वताहुन या जगातल्या गोष्टींना दिलेल्या भेटी म्हणजे, आपल्यासाठी ते सारं, 'एक विविधतेचा अनुभव' आहे. हे उमजायला हवं. अन्यथा, स्वत्व गमाविण्याची वेळ येवून आपण परावलंबी आणि गुलाम बनू शकतो.
वास्तवातले गेम्स आणि आभासी गेम्स दोन्हीही महत्वाचे असतात. पण, कधी ? त्यांच्यात जेव्हा उचित संतुलन राहतं तेव्हा. आपल्या आयुष्यात आलेले प्रत्येक क्षण आनंदीच असतात. केवळ, त्या-त्या क्षणांचं सार्थकी महत्व, त्या महत्वाची लावलेली सवय आणि त्या सवयींमध्ये समकाळानुसार , वयानुसार केला जाणारा बदल यांना आत्मसात करता यायला हवं. या टप्प्यांना पालकांनी आपल्या पाल्यात उतरवलं तर पाल्याच्या आयुष्याचं तात्पर्य पुढे एक वारसा म्हणून नक्कीच संक्रमित होऊ शकतं. संतुलन असेल तर, जबाबदारी' चा अर्थ, 'स्वाभाविकता' व्हायला वेळ लागत नाही.
सहिष्णुतापूर्वक नाती जोपासण्यातच खरा आनंद आहे ; आणि संतुलन कसं राखलं जातं ? त्यातच त्याचं उत्तर आहे. त्यामुळे यदा-कदाचित कधी एखादा प्रश्न जरी उपस्थित झाला तरी त्यावर असणारं उत्तर हे आपली खेळी सदैव अजिंक्य ठेवेल हे मात्र नक्कीच अविश्वासू नसणारेय.
धन्यवाद !
अनमोल सुतार (कवि अन्नू),
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.
ReplyForward
|
Comments
Post a Comment