Posts

Showing posts from 2021

अंधार जेव्हा होई प्रकाशाचा वैरी

 © Anmol Sutar-Annu.                                                       अंधार आणि प्रकाश खरं तर दोन्हीही परस्परांचे कट्टर विरोधाभास. तसच परस्परां‍साठी तितकेच अनुरूप सुद्धा. परस्परावलंबित्वाचा सिद्धांत अगदी दोघांनाही लागू होऊन राहतो. आता त्याचं सविस्तर स्पष्टीकरण मी या लेखात देत नाही. क्षमस्व ! अनुरूपता जिथं नांदते तिथं विरोधाभास सुद्धा आपली भूमिका अगदी निक्षून बजावतात. त्याशिवाय , संतुलन म्हणजे काय ? याची व्याख्या आपण जाणू शकणार नाही.   पण , बऱ्याच वेळा एखादी गोष्ट शक्य असूनही आपण , त्या गोष्टीला मुद्दाम तर कधी नकळतपणे अशक्य करून ठेवतो आणि होणार्‍या नुकसानीला फार कमी वेळा स्वत:ला जबाबदार धरतो. तसच जास्तीत-जास्त त्या गोष्टीच्या व्यवस्थेलाच कारणीभूत ठरवतो. अशानं सुविधा असून त्यांचा काहीच उपयोग राहत नाही. ज्ञानाच्या अभावामुळे प्रगतीचा आणि विकासाचा आलेख तटस्थच ठरतो किंवा थोड्या प्रमाणात अधोगतीकडेही झुकतो. तशीच सवय लागली तर पुढची पिढी धडपडण्या...

'एका अनर्थाचा गुंता' - It's Complicated ?

                                                                                              ‘इट्स कॉम्प्लीकेटेड’ असं शीर्षक देवून नुकतीच एक नवीन संकल्पना मनात तयार होत असताना त्याच संकल्पनेवर आधारित, ‘न सुटणारा गुंता’ करणाऱ्या अनर्थाची एक घटना या पृथ्वीतलावर प्रत्यक्षात साकार झाली. अशा कितीतरी घटना या जगात क्षणाक्षणाला जन्म घेत असतात. काहींचा कसातरी उचित निकाल लावला जातो. तर, काही घटना तर्क-वितर्काच्या मैदानात खेळत राहण्यातच धन्यता मानतात. काही घटनांचा निकाल लावताच येत नाही. मग उरतो एकच पर्याय तो म्हणजे त्या घटनांना तर्क-वितर्काच्या मैदानात खेळायला लावणं. तेही अगदी आयुष्यभर. काही घटनांवर तर चक्क पांघरूनही घातलं जातं. तर काही घटना जगासमोर येतच नाहीत. पांघरून घातलेल्या आणि...