स्वातंत्र्य आमच्या मुठीत - डिजिटल वर्ल्ड २०१६.
'स्वातंत्र्य' या शब्दाचा अर्थ सर्वानाच ठाऊक आहे आणि असेलही. पण, तरीही माझ्या अनुषंगाने मला असं वाटतं की, बंधनं नसून बंधनं योग्य रित्या पाळणं किंवा त्यांचा अवलंब करणं. थोडक्यात, स्वछंदी, अगदी मनाला अभिप्रेत असेल तसा स्वैराचार करणं. पण, मानवास योग्य अशा सहज प्रवृत्तीच्या पलीकडे तर जात नाही ना आपलं मन याचं मात्र भान ठेवायला हवंय. थोडक्यात काय तर, मानवास यथायोग्य अशी सहजप्रवृत्ती म्हणजे स्वातंत्र्य . आपल्याला असलेल्या गरजा जेव्हा आपण आपल्या इचछेनुसार,वेळेनुसार आणि पैशांनुसार अमानवी म्हणजेच कृत्रिम गोष्टींद्वारा पूर्ण करतो तेव्हाच अनुभव यायला सुरवात होत असते 'डिजिटल युगाची'. खरं तर तंत्रज्ञानाची आणि माझी ओळख जेव्हापासून माझ्या गरजांची पूर्तता त्यातल्या सोयी सुविधांपासून व्हायला लागली तेव्हापासून खऱ्या अर्थाने झाली. वेगवेगळ्या उपकरणांची आणि कामांची नावे सांगायची म्हंटली तर यादीच काढावी लागेल. मला तर स्वातंत्र्य अगदी यथोचितच अनुभवायला मिळत आहे...