स्वातंत्र्य आमच्या मुठीत - डिजिटल वर्ल्ड २०१६.
'स्वातंत्र्य' या शब्दाचा अर्थ सर्वानाच ठाऊक आहे आणि असेलही. पण, तरीही माझ्या अनुषंगाने मला असं वाटतं की, बंधनं नसून बंधनं योग्य रित्या पाळणं किंवा त्यांचा अवलंब करणं. थोडक्यात, स्वछंदी, अगदी मनाला अभिप्रेत असेल तसा स्वैराचार करणं. पण, मानवास योग्य अशा सहज प्रवृत्तीच्या पलीकडे तर जात नाही ना आपलं मन याचं मात्र भान ठेवायला हवंय. थोडक्यात काय तर, मानवास यथायोग्य अशी सहजप्रवृत्ती म्हणजे स्वातंत्र्य .
आपल्याला असलेल्या गरजा जेव्हा आपण आपल्या इचछेनुसार,वेळेनुसार आणि पैशांनुसार अमानवी म्हणजेच कृत्रिम गोष्टींद्वारा पूर्ण करतो तेव्हाच अनुभव यायला सुरवात होत असते 'डिजिटल युगाची'. खरं तर तंत्रज्ञानाची आणि माझी ओळख जेव्हापासून माझ्या गरजांची पूर्तता त्यातल्या सोयी सुविधांपासून व्हायला लागली तेव्हापासून खऱ्या अर्थाने झाली. वेगवेगळ्या उपकरणांची आणि कामांची नावे सांगायची म्हंटली तर यादीच काढावी लागेल. मला तर स्वातंत्र्य अगदी यथोचितच अनुभवायला मिळत आहे. त्यामुळे मी सदैव आभारीच आहे हे 'डिजिटल युग' निर्माण करणाऱ्यांचा. इच्छा,वेळ,गरज आणि पैसा यांच्या एकत्रीकरणांतूनच मी 'डिजिटल युगाचा' आस्वादक आहे. त्यातूनच मला सुखी-समाधानी आयुष्य जगता येत आहे. या जगावर या तंत्रज्ञानाची ताकद तर आहेच पण, आपल्या प्रत्येक तंत्रज्ञांनी कृतींचा एक इतिहासही नकळतपणे तयार होत असतो. हेही मला छानच वाटतं. तंत्रज्ञानाकडून प्रत्येकाच्या गरज पूर्ण केल्या जातातच शिवाय त्यांचा इतिहास आढावाही भक्कम क्षमतेने पेलला जातो. याचाही सार्थ असा अभिमान वाटतो. संपूर्ण या जगाला सादरीकृत असं एक ठिकाणच मिळत आहे. पण, आपण समाज योग्य काळजी आणि सुरक्षा आत्मसात करून घेतला तर 'स्मार्ट जगासोबत स्मार्ट' असा आनंदही मिळेल.
या युगात वावरताना स्वातंत्र्याची व्याख्या बदलली आहे असं मला तरी वाटत नाही. पण, विनिमय करणं,दूरवर विस्तारित असून सुद्धा आठवणींनी विचारांचं अगदीच जवळ येणं यामुळे जग जवळ आलंय असं म्हणायला हि काहीच हरकत नाहीये. पण, हे सर्व घडविण्याचा, कमीत कमी वेळात कृतिशील करण्याचा 'वेग' मात्र कितीतरी पटींनी वाढलाय हे बदलनीय सत्य मान्य करावं लागणार आहे. वरील सर्व गोष्टींमधूनच मानव 'डिजिटल युगात' वावरत असतो. हे काय नवल तर आहेच पण, मला मनाच्या अवस्थांना, नैतिकतेला,प्रबोधनाला अनुसरून काळजीसाठी सांगावस वाटत. की, जेव्हा आपण या 'डिजिटल युगाशी' संबंधित होऊ तेव्हा त्याचे सर्व नियम आणि आपल्या कामकाजाची यादी समोर ठेवून काम करूयात, एखादी अनैतिक गोष्ट निदर्शनास आल्यास तात्काळ माघार घेऊयात आणि त्या गोष्टीसंबंधित अभ्यासक तज्ज्ञांचा सल्ला घेऊन पुढे सरकूयात . आपली कामे उरकलीत की, 'डिजिटल युगापासून' बाजूला होणं हेच स्वीकारुया. हे जर प्रत्येकाने ठरवलं तर 'डिजिटल' स्वातंत्र्य सचेतनाने चिरायू होत राहील. कारण, शेवटी 'दिसणं' यापेक्षा 'पाहणं' यात जास्त आत्मीयता असते.
अनमोल सुतार. (अन्नू)
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.
Reply on www.facebook.com/Annu Sutar
/Kavyakshan-Live the love
kavyakshan@gmail.com
www.twitter.com/Annu Sutar@Kavyakshan
All Rights Are Reserved Kavyakshan-Live the love @2008.
Publishing in 'Sakal' News Paper. Maharashtra, India.
/Kavyakshan-Live the love
kavyakshan@gmail.com
www.twitter.com/Annu Sutar@Kavyakshan
All Rights Are Reserved Kavyakshan-Live the love @2008.
Publishing in 'Sakal' News Paper. Maharashtra, India.
Comments
Post a Comment