परीक्षा कुणाची ? विद्यार्थ्यांची, पालकांची, कि शिक्षकांची ?
सध्याच्या परीक्षेच्या आणि शिक्षण व्यवस्थेच्या विश्वात सचेतनत्व राखून निरंतरता ठेवण्याचं कार्य हे पालक-विद्यार्थी आणि शिक्षक यांच्याकडेच आहे. बाकीच्या कोणत्याही संबंधित गोष्टी असतील तर त्या या तिघांच्या उपविभागातल्या ठरतात. असं मला वाटतं. पण, मूळ उगमस्थान मात्र कृतिरित्या वरील तिघांकडूनच घडायला हवं. त्याला अनुसरून शिक्षण व्यवस्था ठरवली तर उत्तम ' शिक्षणपीठ ' व्हायला अवधी लागणार नाही. आपण नमूद केलेल्या प्रश्नांविषयी सांगायचं म्हंटल तर, ' नापास ' या शब्दाची धारणाच मुळात भीतीच निर्मितीकेंद्र आहे. पूर्वीच्या ' दडपणापेक्षा ' आताच्या युगातल्या ' एकटेपणामुळे ' त्या शब्दातून एक भयानक धास्तीच सतत आसपास वावरत असल्याचं दिसून येतय. मग त्यावर उपाय म्हणून बेकायदेशीर पावलंही टाकली जातात हेही काही कमी नाहीये. त्याम...