'ती दूर-दूर.....'चा समावेश आता 'काव्यशिल्प' या संग्रहात.
बारामती, दिनांक १७ मार्च २०१७, श्री.विनोद पाटील. साहित्यप्रेमी मंडळ आणि साहित्य,कला व संस्कृती मंच सोमेश्वरनगर,बारामती,जि.पुणे यांनी आयोजित केलेल्या 'काव्यशिल्प' या काव्यसंग्रहाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. साहित्यप्रेमी मंडळाचा हा सातवा काव्यसंग्रह ठरला. प्रा.डॉ.जया कदम आणि संस्थापक व अध्यक्ष प्रा.हनुमंत माने संपादित प्रस्तुत काव्यसंग्रहात अनमोल सुतार, 'कवी अन्नू' यांच्या 'ती दूर-दूर......' या कवितेचा समावेश करण्यात आला आहे. तसेच इतर ९९ कवींच्या कविताही या काव्यसंग्रहात समाविष्ठ करण्यात आलेल्या असून सर्व कवींना सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह पारितोषिक म्हणून मंडळातर्फे देऊन गौरविण्यात आले. अशी माहिती 'काव्यक्षण' चे वृत्त प्रसारक आणि सूत्रधार श्री.विनोद पाटील यांनी दिली. ...