'ती दूर-दूर.....'चा समावेश आता 'काव्यशिल्प' या संग्रहात.
बारामती, दिनांक १७ मार्च २०१७, श्री.विनोद पाटील.
साहित्यप्रेमी मंडळ आणि साहित्य,कला व संस्कृती मंच सोमेश्वरनगर,बारामती,जि.पुणे यांनी आयोजित केलेल्या 'काव्यशिल्प' या काव्यसंग्रहाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. साहित्यप्रेमी मंडळाचा हा सातवा काव्यसंग्रह ठरला. प्रा.डॉ.जया कदम आणि संस्थापक व अध्यक्ष प्रा.हनुमंत माने संपादित प्रस्तुत काव्यसंग्रहात अनमोल सुतार, 'कवी अन्नू' यांच्या 'ती दूर-दूर......' या कवितेचा समावेश करण्यात आला आहे. तसेच इतर ९९ कवींच्या कविताही या काव्यसंग्रहात समाविष्ठ करण्यात आलेल्या असून सर्व कवींना सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह पारितोषिक म्हणून मंडळातर्फे देऊन गौरविण्यात आले. अशी माहिती 'काव्यक्षण' चे वृत्त प्रसारक आणि सूत्रधार श्री.विनोद पाटील यांनी दिली.
'कवी अन्नू' यांच्या प्रस्तुत कवितेत "अजूनही उद्विग्नतेच्या गर्तेत आपलं सम्पूर्ण आयुष्य व्यतीत करणाऱ्या 'ती' ला शब्दांकित करून 'ती' च्या जन्मापासून ते वयोवृद्ध अवस्थांना उचितपणे मांडले आहे. पूर्वीपेक्षा आजच्या जगात 'ती' च्या आयुष्याला स्वतंत्रता लाभली असली तरी अगदीच नगण्य असे आहे. त्यामुळे शीर्षकाला उचित परिमाण लावून प्रस्तुत कविता 'स्त्री' वर भाष्य करणारी ठरते" असे या कवितेतून अनुभवता येते. नैतिकता राखणे,काळजी घेणे,मनुष्य म्हणून जगविणे,आत्मीयतेला दाद देणे,आदर करणे,समजत काळजीपूर्वक स्थान देणे आणि कौटुंबिक पातळीवरही 'ती' ला योग्य मानवी असे आयुष्य जगण्यास मुभा देणे. या गोष्टी प्रत्येक 'ती' च्या बाबतीत घडाव्यात असे मत कवी अन्नू व्यक्त करतात. केवळ संभाषणाअभावी 'ती' आणि इतर यांच्यातले नाते कसेतरी जगू पाहते आहे. तर असे न होता प्रत्येकाला वेळ,गरज,पैसा यांच्यात संतुलन साधून छान असे आयुष्य मानव म्हणून नैसर्गिक जगता यायला हवे असे तात्पर्य यातून प्रत्ययाला येते.
स्नेहवर्धन प्रकाशन,पुणे यांच्याकडून प्रकाशित झालेल्या या काव्यसंग्रहात कर्नाटक राज्यातील बेळगाव सहित महाराष्ट्र राज्यातील एकूण १८ जिल्ह्यातील कवींनी सहभाग दर्शविला. प्रसिद्ध गीतकार आणि कवी , मा.श्री. प्रवीण दवणे यांची प्रस्तावना लाभलेला हा काव्यसंग्रह फारच सुरेख साकारला आहे. याचसोबत कलाविष्काराला संधी देऊन,एकोपा जपून,एक कलावंत म्हणून संपूर्ण विश्वात सृजनाच्या इतिहासात अजरामर होण्याचा व करण्याचा अनोखा असा अभिनव उपक्रम 'साहित्यप्रेमी मंडळ' गेली १० वर्षे राबवित आहे याबद्दल त्यांचेही कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.
Poem Link.....
www.facebook.com / Annu Sutar
/ Annu M Sutar
/ Kavyakshan - Live the love
/ Best memories of sawarde, / 51 Thana Hostel Boys
Mail - kavyakshan@gmail.com
www.twitter.com / Annu Sutar @Kavyakshan

Comments
Post a Comment