नव्या क्षितिजाच्या दिशेनं....
काळ बदलत राहणं आणि सतत अतूटपणे पुढे सरकत ठेवणं ही आपल्या सृष्टीची अविरत अशी प्रक्रिया आहे. प्रत्येक सजीवाने आपल्याला लाभलेल्या काळात आपलं आयुष्य व्यतीत करणं म्हणजे त्या सजीवाचा तो समकाळ मानावा लागेल. शोध लागले की जुन्या गोष्टी कालबाह्य होणं अपरीहार्य असतं. तसं ही जुन्या गोष्टी जरा जरी त्रासदायक ठरायला लागल्या की नव्या गोष्टी अंमलात आणून ठेवणं हेही अटळच असतं. आपल्या केंद्र सरकारनं खुल्या केलेल्या बहू प्रतिक्षित नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांच्या मसुद्यावर मला काही मतं अभिव्यक्त करावीशी वाटत आहेत. ती मतं, मी अभिप्राय दाखल या लेखात मांडतो आहे. मुद्दा (अ) ५ + ३ + ३ + ४ असा आकृतीबंध मान्य झाल्यामुळे व्यक्तिगत प्रगतीला नक्कीच एक यथा...