जागतिक स्वच्छता दिन २ ० २ ५ .

जागतिक स्वच्छता दिन २ ० २ ५  निमित्त, 'सकाळ-सप्तरंग', ह्या सदराखाली 'फिरस्ती' कार प्रसिद्ध लेखक, श्री. उत्तम कांबळे यांच्या सोबत केलेली लेखात्मक चर्चा आणि उपाय ह्यांचा परामर्श, मी आज आपणापर्यंत 'जागतिक स्वच्छता दिना'च्या औचित्याबदल अभिव्यक्त करीत आहे. 

केवळ आपल्या भारतातच नव्हे तर, या जगाच्या कोणत्याही प्रदेशात स्वच्छता करण्यापूर्वी कचरा होऊ न देणं हेच महत्वाचं आहे. पण,तरीही काही उपाय पुढीलप्रमाणं. 
१) सध्या जिवंत असलेला कचरा एखाद्या यंत्रणेमार्फत संपूर्ण नष्ट केला जावा. काही थोडे परिणाम सोसावे लागतील मात्र त्याची तयारी प्रतिकार क्षम असावी आणि काळजीही घेतली  जावी. 
२) प्रत्येकाने मन,बुद्धी,शरीर,वेळ आणि पैसा या मूलभूत गोष्टींचा संतुलित विचार करावा.
३) इच्छा बाळगण्यापेक्षा जास्त भर गरजांवर असावा.
४) कचऱ्याचं सुका आणि ओला असं वर्गीकरण करावं. ज्या कचऱ्यापासून खत निर्मिती करता येते तो त्यासाठीच वापरावा. सुका कचरा न जाळता किंवा इतरत्र न फेकता किंवा आपल्या जगन्मातेला उर्फ वसुंधरेला कोणतीही हानी न पोहचविता त्यांचं पुढील प्रमाणे व्यवस्थापन करावं.
                     मनुष्य ---> गरज ---> उत्पादक ---> वस्तू निर्मिती ---> मूल्य ---> ग्राहक ---> पुनर्वापर, टिकावू किंवा खतनिर्मिती ---> पदार्थ वापर झाल्यानंतर व वेष्ठन, वस्तू विक्रेत्याकडे जमा कराव्यात  ---> वस्तूच्या प्रति १० रुपये प्रमाणे ५० पैसे ग्राहकाने विक्रेत्याकडून घ्यावेत ---> विक्रेत्याने तिचं वस्तू दलालाकडे देताना ७५ पैसे दलालांकडून घ्यावेत.---> दलालांनी तिचं वस्तू उत्पादकाकडे द्यावी आणि १०० पैसे घ्यावेत.
५) वस्तू पुनर्वापरासाठी योग्य असेल तर ती पुन्हा-पुन्हा वापरावी.
६) असं केल्यास केवळ पदार्थांच्याच निर्मितीसाठी काम,वेळ,खर्च करावा लागेल आणि वेष्ठन वस्तूंसाठी वेळ,खर्च आणि काम कमी प्रमाणात लागेल. विज्ञानाची मदत १०० % असावी.
७) यासाठी आपण वापरीत असलेल्या सर्व गोष्टींच्या निर्मात्यांचे संपर्क आपल्याकडे असणं गरजेचं आहे. त्यातूनच तर पुनर्वापर सहज शक्य होणार आहे.
                                 हा असा उपक्रम आपल्या 'डिजिटल' होत चाललेल्या युगात अंमलात आणला आणि कृतीत उतरवला तर नक्कीच कचरा कमी-कमी होत जाईल. त्याच बरोबर आता कचरा गोळा करून रस्ते निर्मितीचं नवं तंत्रज्ञान हि ठिकठिकाणी वापरायला सुरवात झालेली आहे. आपणही त्यात मग सामील होऊन जायला काय हरकत आहे ? विघटन होणाऱ्या वस्तू,पदार्थ काय कवी, ' भालचंद्र नेमाडे' यांच्या काव्य ओळींप्रमाणे 'भरलेले पोट पुन्हा-पुन्हाचे रिते' अशा असतात त्यामुळे त्यांचा प्रश्न पडणार नाही. पण पुनर्वापर करता येणाऱ्या वस्तूंची पुन्हा नवनिर्मिती करण्याचा अट्टहास कशाला ? मानवाच्या किमान मूलभूत गरजेतसुद्धा पुनर्वापर १०० % शक्य आहे. 
कचऱ्याची निर्मिती उत्पादक आणि ग्राहक यांच्याकडून मुळात होत असते. 
                                 मी प्रयत्न करायला सुरवात केली आहे पण, तरीही वाटतं कि, केवळ पैसाच हा अशा प्रकारे कचऱ्यावर आणि मानसिकतेवर परिणाम करू शकतो. सरकारच्या इतर प्रबोधनापेक्षा. 
धन्यवाद !
अनमोल सुतार ( कवी अन्नू ),
शिवाजी विद्यापीठ , कोल्हापूर.               
                                                                                                                                                            
                                                                                                                                                                             

Comments

Popular posts from this blog

'द व्हिलन' - 'तो' ही आणि 'ती' ही.

अंधार जेव्हा होई प्रकाशाचा वैरी