'साकारती अंकुर जेव्हा....'
प्रश्न तयार झाले की, त्यावर उत्तरं तयार करावी लागतात. तरीही, हा खेळ समकाळानुसार पुन्हा-पुन्हा सुरूच राहतो. याला, शोध किंवा संशोधन म्हणायला काहीच हरकत नसावी. मुळात, प्रश्न सगळ्यांनाच सापडतात. पण, त्यांची उत्तरं मात्र सगळ्यांनाच सापडतील असं होत नाही. मग उरतात केवळ दोनच विकल्प. एक तर दुर्लक्ष आणि दूसरा विकल्प म्हणजे, काहीही व्यक्त करून मोकळं होणं. पण, प्रश्न विचारणारे लहानगे असतील तर ? तर, असे खूपच कमी पालक आहेत की, जे आपल्या कौशल्याने आपल्या पाल्याच्या प्रश्नांना सन्मुख ठेवतात ; आणि बाकीचे पालक, एक तर दुर्लक्ष किंवा काहीही उत्तर देवून मोकळं होणं पसंद करतात. आपल्या पाल्याच्या प्रश्नांना सन्मुख ठेवणारे प...