गेम्स - वास्तव आणि आभास.
'खेळ' आपल्या आयुष्यात आला की आपला शारीरिक आणि मानसिक विकास होणारच यात कोणताही प्रश्न नाही. पण, सध्या आभासी जगतानं ,'शरीरासाठी विनासायास' असं तंत्र आणलय. यामुळे मनावर बरे-वाईट असे परिणाम होणार. पण, शरीराचं काय ? शरीरावर वाईट परिणामांची ताकद नक्कीच आपली सत्ता गाजवणार यातही कोणता प्रश्न नाही. बुद्धीला जागृत राहण्यासाठी मानसिकता महत्वाची आहे. तसच शरीराला सचेतन प्राप्त होण्यासाठी हालचालही महत्वाची आहे. ती नसेल तर आणि मनावर वाईट परिणाम होत असतील तर, मानसिक आणि शारीरिक आजार यांना एकत्रितपणे सामोरं जावं लागेल. एक वेळ, कमीत-कमी वयात जास्तीत-जास्त प्रगती होऊ शकेल अथवा अधोगतीही पण, या परिणामांना साथ द्यायला आपलं शरीर ठीक असायला हवं की नको ? मुळात, खेळासाठी वेळापत्रक आखून ठेवणं आणि त्याचा वापर क...