'कनेक्टनेस' लघुचित्रपट आता ठरतोय रसिकांशी नेहमी 'कनेक्ट'. 
मुंबई , दि.- ०८ फेब्रुवारी २०१७.
                                                   मुंबई येथे ३० जानेवारी २०१७ ते ०१ फेब्रुवारी २०१७ या कालावधीत पार पडलेल्या 'युनिव्हर्सल मराठी' तसेच 'मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ' कृत पाचव्या 'माय मुंबई लघुचित्रपट महोत्सवात नामांकन प्राप्त झालेला 'काव्यक्षण' प्रस्तुत 'कनेक्टनेस' हा लघुचित्रपट आता जगभरातल्या सर्व रसिकांशी यु ट्यूब द्वारा कनेक्ट झालेला आहे. यु-ट्यूब च्या सर्वेक्षणानुसार 'कनेक्टनेस' ०३ फेब्रुवारी ला सर्वत्र प्रदर्शित झाल्यानंतर सर्व रसिकांप्रत पोहचलेला आहे. अशी माहिती 'काव्यक्षण' चे वृत्त प्रसारक व सूत्रधार श्री. विनोद पाटील यांनी दिली.
                                                  प्रत्येकाला जीवनात आपलीशी , हवी हवी अशी वाटणारी प्रेम आणि जुळून येण्याची अवस्था आपल्या इच्छा किंवा गरजा यांचा मेळ घालून आणता येत नाही. तर, आपल्या क्षमता जाणून सहज प्रवृत्तीने साकारणारी ती एक निसर्गदत्त देणगी असते. हि देणगी नियतीकडून, आपल्या कृतींना जाणून अगदी योग्य वेळी आपल्याला बहाल केली जाते. ती मग आपण काळजीपूर्वक जपून, ओळखून जगायला शिकलो पाहिजे. तसंच आयुष्यात संवादही महत्वाचा आहे. सध्याच्या तंत्रज्ञानाचा वापर करताना एक गोष्ट नायकाकडून संवादशून्यामुळे चुकीच्या व्यक्तीकडे जाते पण, ती गोष्ट चांगली असल्यामुळे अनर्थ न होता छान अर्थ प्राप्त करून देणारी ठरलेली आहे असे यात दाखविले आहे. म्हणूनच अनुरूपतेमुळे नियतीने दोन बंध जुळविण्याची किमया साकारली आहे. केवळ करिती करणाऱ्यांनीही नियतीला जाणून दाद दिल्याने एक अप्रतिम 'कनेक्टनेस' साध्य झाला आहे. तसेच प्राण्यांशीही असलेली आत्मीयता सध्या महत्वाची आहे हाही संदेश या लघु चित्रपटातून लघु चित्रपट दाखवून सुंदररित्या मांडलाय.
                                                 अशी या संकल्पनेची लेखक,कवी अनमोल सुतार ( अन्नू ) यांची कथा त्यांनी स्वतः संवाद लेखनासहित दिग्दर्शितही केली आहे. लघुचित्रपटाचं चित्रीकरण 'कोल्हापूर' शहरातल्या परिसरात करण्यात  आलेलं असून, अभिनेता सिद्धार्थ बदी आणि नायिका तेजा पाटील यांच्या नेमक्या पण, हलक्याशा अभिनयाने लघुचित्रपट जास्तच भावतो आहे. आपापल्या भूमिकेला प्रत्येकाकडून न्याय देण्याचा प्रयत्न थोडा कमी पडला असला तरी, रसिकांप्रत लघुचत्रपटाचा आशय सहज पोहचतो आहे. अनमोल सुतार, नवोदित अनुजा लोहार, अविनाश पाटील आणि राजगोंडा वळिवडे यांच्या सहायक भूमिका ठळकपणे आकारल्या आहेत.
                                                निर्माता म्हणून श्री.मोहन सुतार आणि अक्षय क्षीरसागर यांनी सहकार्य केलेलं असून छायाचित्रणही स्वतः अक्षय क्षीरसागर यांनी पार पाडलेल आहे. प्रकाश योजनेसाठी सुमित सासणे तर प्रसंग मुद्रणासाठी आसावरी दंडगे यांचं योगदान लाभलेलं आहे. ध्वनी मुद्रण जयभीम शिंदे आणि सहाय्यक दिग्दर्शन तसेच समीक्षक म्हणून राजेंद्र चौगुले यांनी जबाबदारी साकारली आहे.
                                                 लघुचित्रपटासाठी आधारस्तंभ ठरलेल्या व्यक्तींचेही 'काव्यक्षण' कडून  विशेष आभार मानण्यात आलेले आहेत. ठरलेल्या नियोजनानुसार २०१७ या वर्षाअखेरपर्यंत  'कनेक्ट्न्स' संपूर्ण भारतभर आयोजित असलेल्या विविध लघुचित्रपट महोत्सवात दाखल करण्याचा मानस दिग्दर्शक अनमोल सुतार ( कवी अन्नू ) यांनी व्यक्त केलेला आहे. तसेच आगामी दोन लघुचित्रपटांचं चित्रीकरणही नुकतच पूर्ण झालेलं असून त्यांना लवकरच रसिकांच्या भेटीला आणण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
Mail.- kavyakshan@gmail.com
Short Movie Link Given Below. Watch It As Your Asset Time. You Can Download & Share Given Link To Yours. (eg. Whats App, Facebook etc.) Thank You.
' ConnectNess ' A Short Movie. ---- https://youtu.be/O8iIzL3G1x0 Or Enter in Google - Kavyakshan.

Comments

Popular posts from this blog

जागतिक स्वच्छता दिन २ ० २ ५ .

'द व्हिलन' - 'तो' ही आणि 'ती' ही.

अंधार जेव्हा होई प्रकाशाचा वैरी