चिरतरुण 'दूरदर्शन'
साधेपणा आणि आशय समृद्धी यांना, सदैव आपल्या सोबत घेऊन आपल्या वयाची साठ वर्षं पूर्ण करणार्या आपल्या, 'दूरदर्शन' ला माझ्याकडून सदाहरित शुभेच्छा आणि अभिनंदन सुद्धा ! दूरदर्शनची सुरवात, त्याचा इतिहास, प्रगतीचे टप्पे, त्यात आलेलं यश-अपयश, आवश्यक असे समकालीन बदल आणि आजचा दिवस याबद्दल सांगण्यासारखं खूप काही आहे. तरीही त्याची मांडणी मला या लेखात करून देता आली नाही याबाबत क्षमस्व ! पण, दूरदर्शन आणि मी यांचं नातं मात्र मला आवर्जून व्यक्त करावसं वाटतं. ...