Posts

'ती दूर-दूर.....'चा समावेश आता 'काव्यशिल्प' या संग्रहात.

बारामती, दिनांक १७ मार्च २०१७, श्री.विनोद पाटील.                                                                          साहित्यप्रेमी मंडळ आणि साहित्य,कला व संस्कृती मंच सोमेश्वरनगर,बारामती,जि.पुणे यांनी आयोजित केलेल्या 'काव्यशिल्प' या काव्यसंग्रहाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. साहित्यप्रेमी मंडळाचा हा सातवा काव्यसंग्रह ठरला. प्रा.डॉ.जया कदम आणि संस्थापक व अध्यक्ष प्रा.हनुमंत माने संपादित प्रस्तुत काव्यसंग्रहात अनमोल सुतार, 'कवी अन्नू' यांच्या 'ती दूर-दूर......' या कवितेचा समावेश करण्यात आला आहे. तसेच इतर ९९ कवींच्या कविताही या काव्यसंग्रहात समाविष्ठ करण्यात आलेल्या असून सर्व कवींना सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह पारितोषिक म्हणून मंडळातर्फे देऊन गौरविण्यात आले. अशी माहिती 'काव्यक्षण' चे वृत्त प्रसारक आणि सूत्रधार श्री.विनोद पाटील यांनी दिली.               ...
'कनेक्टनेस' लघुचित्रपट आता ठरतोय रसिकांशी नेहमी 'कनेक्ट'.  मुंबई , दि.- ०८ फेब्रुवारी २०१७.                                                    मुंबई येथे ३० जानेवारी २०१७ ते ०१ फेब्रुवारी २०१७ या कालावधीत पार पडलेल्या 'युनिव्हर्सल मराठी' तसेच 'मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ' कृत पाचव्या 'माय मुंबई लघुचित्रपट महोत्सवात नामांकन प्राप्त झालेला 'काव्यक्षण' प्रस्तुत 'कनेक्टनेस' हा लघुचित्रपट आता जगभरातल्या सर्व रसिकांशी यु ट्यूब द्वारा कनेक्ट झालेला आहे. यु-ट्यूब च्या सर्वेक्षणानुसार 'कनेक्टनेस' ०३ फेब्रुवारी ला सर्वत्र प्रदर्शित झाल्यानंतर सर्व रसिकांप्रत पोहचलेला आहे. अशी माहिती 'काव्यक्षण' चे वृत्त प्रसारक व सूत्रधार श्री. विनोद पाटील यांनी दिली.                                                   प्रत्येकाला...

स्वातंत्र्य आमच्या मुठीत - डिजिटल वर्ल्ड २०१६.

    'स्वातंत्र्य' या शब्दाचा अर्थ सर्वानाच ठाऊक आहे आणि असेलही. पण, तरीही माझ्या अनुषंगाने मला असं वाटतं की, बंधनं नसून बंधनं योग्य रित्या पाळणं किंवा त्यांचा अवलंब करणं. थोडक्यात, स्वछंदी, अगदी मनाला अभिप्रेत असेल तसा स्वैराचार करणं. पण, मानवास योग्य अशा सहज प्रवृत्तीच्या पलीकडे तर जात नाही ना आपलं मन याचं मात्र भान ठेवायला हवंय. थोडक्यात काय तर, मानवास यथायोग्य अशी सहजप्रवृत्ती म्हणजे स्वातंत्र्य .                                     आपल्याला असलेल्या गरजा जेव्हा आपण आपल्या इचछेनुसार,वेळेनुसार आणि पैशांनुसार अमानवी म्हणजेच कृत्रिम गोष्टींद्वारा पूर्ण करतो तेव्हाच अनुभव यायला सुरवात होत असते 'डिजिटल युगाची'. खरं तर तंत्रज्ञानाची आणि माझी ओळख जेव्हापासून माझ्या गरजांची पूर्तता त्यातल्या सोयी सुविधांपासून व्हायला लागली तेव्हापासून खऱ्या अर्थाने झाली. वेगवेगळ्या उपकरणांची आणि कामांची नावे सांगायची म्हंटली तर यादीच काढावी लागेल. मला तर स्वातंत्र्य अगदी यथोचितच अनुभवायला मिळत आहे...